Skip to main content

Meta जाहिरात व्यवस्थापकात कॅम्पेन परिणाम शोधा

  • By Meta Blueprint
  • Published: Jul 14, 2022
  • Duration 5m
  • Difficulty Intermediate
  • Rating
    Average rating: 0 No reviews

या धड्‍यात कॅम्पेन, ॲड सेट आणि ॲड स्तरावर कॅम्पेन परिणामांचा रिव्ह्यू कसा करावा हे कव्हर केले आहे.

या धड्‍यामुळे तुम्ही पुढील गोष्टी करू शकाल:

  • कॅम्पेन, ॲड सेट आणि ॲड स्तरावर परिणाम पहा.
  • तुमच्या कॅम्पेनशी सर्वाधिक समर्पक असलेले मेट्रिक्स शोधा.

Meta जाहिरात व्यवस्थापकात कॅम्पेन परिणाम समजून घ्‍या

जाहिरात व्यवस्थापकातील रिपोर्टिंगमुळे एखादा व्यवसाय त्याची जाहिरात करण्‍याची उद्दिष्टे साध्‍य करण्‍याच्या किती जवळ आहे हे निर्धारित करण्‍यात तुम्हाला मदत होते. कशामुळे उत्तम कार्य झाले आणि कोणत्या बाबतीत सुधारणा केली जाऊ शकते हे जाणून घेण्‍यासाठी तुम्ही जाहिरात व्यवस्थापकातील मेट्रिक्स वापरू शकता, ज्यामुळे आगामी ॲड कॅम्पेनसाठी माहिती मिळू शकते. जाहिराती प्रसारित होत असताना त्या ऑप्टिमाइझ करण्यासाठी तुम्ही जाहिरात व्यवस्थापकातील मेट्रिक्स देखील वापरू शकता.

जाहिरात व्यवस्थापकातील डीफॉल्ट मेट्रिक्स

कॅम्पेन एकदा समाप्त झाले की, तुम्ही त्याचे परिणाम जाहिरात व्यवस्थापकात पाहू शकता. जाहिरात व्यवस्थापकाच्या डॅशबोर्डमध्‍ये, तुम्ही कॅम्पेनचा प्रत्येक स्तर पाहू शकता (कॅम्पेन, ॲड सेट आणि ॲड). येथे तुम्ही कॅम्पेन उद्दिष्टाशी समर्पक असलेल्या मेट्रिक्‍सचा वापर करून पूर्वीच्या आणि सध्‍याच्या कॅम्पेन, ॲड सेट आणि जाहिरातींची कामगिरी पाहू शकता आणि त्यांची तुलना करू शकता. तुम्ही प्रत्येक स्तरावर ॲक्सेस करू शकता अशा भिन्न मेट्रिकवर एक नजर टाकूया.

LaLueur

आम्ही आधीच्या अभ्यासक्रमात जाणून घेतल्याप्रमाणे, LaLueur ही एक सौंदर्यप्रसाधनांची कंपनी असून सिलिकॉन-मुक्त, पॅराबेन-मुक्त आणि वनस्पती-आधारित प्रॉडक्टमध्‍ये तिची निपुणता आहे. कंपनी तिच्या वेबसाईटवर आणि बुटिक हेअर सॅलूनद्वारे प्रॉडक्ट विकते.*

 

Zahra, डिजिटल मार्केटिंग सल्लागार असून त्यांना LaLueur साठी डिजिटल उपस्थिती तयार करण्‍यात आणि त्याच्या नवीनतम हेअर केअर प्रॉडक्टबाबत जागरूकता निर्माण करण्‍यात मदत करण्यासाठी आणले आहे. 

Zahra पूर्वीच्या कॅम्पेनमधील डेटाचा वापर करून, तसेच नवीन कॅम्पेनच्या येणार्‍या परिणामांमधून, LaLueur ची मदत कशी करू शकतात हे चांगल्या प्रकारे समजून घेण्‍यासाठी मेट्रिकचे विश्लेषण करतील. तुम्ही प्रथम जाहिरात व्यवस्थापक उघडता तेव्हा, डीफॉल्ट डॅशबोर्ड पुष्कळसा खाली दर्शवलेल्या LaLueur जाहिरात व्यवस्थापक खात्यामधील डॅशबोर्ड सारखा दिसतो.


*अस्वीकरण: LaLueur एक काल्पनिक व्यवसाय आहे जो Meta क्रिएटिव्ह शॉपने डिझाइन केला आहे. वास्तविक व्यवसायाद्वारे निर्मित कंटेन्टमधील कोणत्याही समानता हेतुपुरस्सर नाहीत.

रिपोर्ट कसा व्यवस्थापित केला जातो ते जाणून घेण्यासाठी थोडा वेळ घेऊ. तुम्ही निवडू शकता असे तीन टॅब असताना (कॅम्पेन, ॲड सेट आणि जाहिराती), तुमचा डॅशबोर्ड डीफॉल्टनुसार स्वयंचलितपणे कॅम्पेन टॅब दर्शवेल. 

अधिक जाणून घेण्यासाठी हॉटस्पॉट वापरा.

प्रत्येक टॅबवर, तुम्ही भिन्न मेट्रिक्स प्रदान करणारे स्तंभ पाहू शकता जे तुम्ही तुमच्या कॅम्पेनच्या प्रभावाचे विश्लेषण करण्यासाठी वापरू शकता. आपण मुख्‍य स्तंभ पाहूया जे LaLueur साठी असलेल्या डीफॉल्ट कॅम्पेन रिपोर्टमध्‍ये दिसतात.  


स्टेटस आणि कॅम्पेन माहिती. डीफॉल्ट डॅशबोर्ड सेटिंगमधील पहिल्‍या दोन स्तंभांमध्‍ये, जाहिरात वितरण आणि बोली धोरण याबद्दल माहिती दर्शवली असते. 


खालील रिपोर्टमध्‍ये स्टेटस आणि कॅम्पेन माहिती एक्सप्लोर करा.

अधिक जाणून घेण्यासाठी बाण वापरा. 

परिणाम मेट्रिक्स. परिणाम मेट्रिक्समुळे तुम्हाला ॲड कॅम्पेन किती लोकांपर्यंत पोहोचले आणि त्याने साध्‍य केलेले परिणाम कळतात.

 

  • परिणाम: हे ॲडने परिणाम किती वेळा साध्‍य केले ती संख्‍या असून ते निवडलेले उद्दिष्‍ट आणि जाहिरात वितरण ऑप्टिमायझेशन यावर आधारित आहे.

  • पोहोच: जाहिराती किमान एकदा पाहिल्या आहेत अशा लोकांची संख्‍या. पोहोच हे इंप्रेशनपेक्षा वेगळे आहे, यामध्ये त्याच लोकांनी तुमच्या जाहिराती अनेक वेळा पाहण्याचा समावेश असू शकतो.

  • इंप्रेशन: हे निवडलेल्या टार्गेट प्रेक्षकांसाठी जाहिराती स्क्रीनवर किती वारंवार होत्या याचे मापन करते.


अधिक जाणून घेण्यासाठी हॉटस्पॉट वापरा. 

खर्चाचे मेट्रिक्स. ॲड बजेट कसे खर्च केले जात आहे याबाबतचे मेट्रिक्‍स. 

 

  • प्रति परिणाम खर्च: या मेट्रिकची गणना एकूण खर्च केलेली रक्कम भागिले परिणामांची संख्‍या याद्वारे केली जाते. हे निर्देशित करते की किती प्रभावीपणे कमी खर्चात कॅम्पेनने त्याचे जाहिरातीचे उद्देश साध्‍य केले. 

  • खर्च केलेली रक्कम: हा कॅम्पनेवर खर्च केलेला अंदाजे एकूण खर्च आहे. उदाहरणार्थ, हा स्तंभ रिव्ह्‍यूमध्‍ये असलेल्या कॅम्पेनसाठी $0.00 किंवा अलीकडे मंजूर केलेल्या आणि प्रसारणास प्रारंभ झालेल्या कॅम्पेनसाठी $6.57 दर्शवू शकतो. ही संख्‍या नेहमीच बेजटपेक्षा कमी असावी.


अधिक जाणून घेण्यासाठी हॉटस्पॉट वापरा. 

जाहिरात व्यवस्थापकातील रिपोर्टिंग नियंत्रणे

तुम्ही अनेक मेट्रिक्ससाठी जाहिरात व्यवस्थापकातील डीफॉल्ट सेटिंगवर अवलंबून राहू शकता. तुमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचे असलेले आणि तुमच्या व्‍यवसाय उद्दिष्‍ट्‍यांसोबत उत्तमपणे जुळणारे मेट्रिक्स दर्शवण्‍यासाठी तुम्ही रिपोर्ट सानुकूल देखील करू शकता. 


Zahra या LaLueur च्या ट्रॅफिक-केंद्रित जाहिराती कशी कामगिरी करत आहेत त्याबद्दल अधिक जाणून घेण्‍यासाठी उत्सुक आहेत, म्हणून त्यांनी जाहिराती रिपोर्टिंग डॅशबोर्डमधील काही नियंत्रणे समायोजित करण्‍याचे ठरवले. 


Zahra त्यांच्यासाठी सर्वाधिक समर्पक असलेला डेटा व्यवस्थापित करण्‍यासाठी, त्याची मांडणी करण्‍यासाठी आणि तो प्रदर्शित करण्यासाठी जाहिरात व्यवस्थापकात वापरू शकतात त्या टूलवर एक नजर टाकूया.

अधिक जाणून घेण्‍यासाठी टॅब एक्सप्लोर करा. 


तुम्ही जाहिरात व्यवस्थापकात पाहता ते परिणाम शोधण्यासाठी आणि सानुकूल करण्‍यासाठी शोध बार वापरा. तुम्ही यानुसार शोधू शकता: 

  • कॅम्पेनचे नाव

  • ॲड सेटचे नाव

  • ॲडचे नाव

  • कॅम्पेन आयडी

  • ॲड सेट आयडी

  • ॲड आयडी

  • कॅम्पेन टॅग

उदाहरणार्थ, Zahra यांना ज्या विशिष्‍ट ॲड कॅम्पेनच्या सेटमध्‍ये रुची आहे तो आणण्यासाठी त्या हेअरकेअर ब्रॅंड जागरूकता यासारखे कॅम्पेन नाव शोधू शकतात. 


तुमच्या जाहिरातींचा रिपोर्ट सानुकूल करा

तुम्ही डेटा सारणीत स्तंभ जोडून तुमचा जाहिरातींचा रिपोर्ट डॅशबोर्ड सानुकूल देखील करू शकता. तुम्ही तुमच्या रिपोर्टमध्‍ये जोडू शकता ते मेट्रिक्‍स चार भिन्न श्रेण्यांमध्‍ये येतात.

 

1. कामगिरी. यात परिणाम, पोहोच, वारंवारता आणि इंप्रेशन यांसारख्‍या मेट्रिक्सचा समावेश होतो.


2. एंगेजमेंट. यात पेज पोस्ट, मेसेजिंग, मीडिया, क्लिकआणि जागरूकता यांसारख्‍या मेट्रिक्सचा समावेश होतो.


3. रूपांतरणे. यात वेबसाइट रूपांतरणे, वेबसाईट खरेदी, प्रति वेबसाईट रूपांतरण खर्च, मोबाईल ॲप इन्स्टॉल आणि मोबाईल ॲप खरेदी, यांसारख्‍या मेट्रिक्सचा समावेश होतो.


4. सेटिंग. यात प्रारंभ तारीख, समाप्ती तारीख, ॲड सेटचे नाव, ॲड आयडी, वितरण, बोली आणि उद्दिष्‍ट यांसारख्‍या मेट्रिक्सचा समावेश होतो.

LaLueur टीम त्यांच्या हेअर केअर ब्रॅंड जागरूकता कॅम्पेनमध्‍ये एक व्हिडिओ ॲड समाविष्‍ट करते. Zahra यांनी त्यांचे उद्दिष्‍ट म्हणून एंगेजमेंट निवडले नसले तरीदेखील, आगामी कॅम्पेनसाठी एक बेंचमार्क म्हणून वापर करण्‍यासाठी किती लोकांनी व्हिडिओ पाहिला हे दर्शवण्‍याकरिता त्या त्यांच्या जाहिरात व्यवस्थापक रिपोर्टचे स्तंभ सानुकूल करतात.

ॲड परिणाम व्हिज्युअलाईझ करण्‍यासाठी चार्ट तयार करा

अंकीय परिणाम पाहण्‍याव्यतिरिक्त, तुम्ही चार्ट व्हिज्युअलायझिंग ॲड कामगिरी देखील पाहू शकता. हे चार्ट पाहण्यासाठी, कॅम्पेन, ॲड सेट किंवा ॲडचे नाव यावर फिरवा, त्यानंतर चार्ट पहा निवडा.

अधिक जाणून घेण्यासाठी बाण वापरा. 

जाहिरात व्यवस्थापक रिपोर्टिंगमध्‍ये कॅम्पेन, ॲड सेट आणि ॲड स्तरावर टूल आणि मेट्रिक्स आहेत जे ॲड कॅम्पेनच्या परिणामांचे मूल्यांकन करण्‍यासाठी वापरले जाऊ शकतात. पुढे, तुम्ही कॅम्पेन परिणामांचे मूल्याकंन आणि विश्लेषण कसे करू शकता ते आपण पाहूया.

तुमच्या जाहिराती कशी कामगिरी करतात ते जाणून घेण्‍याचे इतर मार्ग

तुम्ही जाहिरात व्यवस्थापकात कॅम्पेन परिणाम पाहण्‍याव्यतिरिक्त, तुमचा कंटेन्ट Facebook पेज इन्साईट आणि Instagram इन्साईटवर कशी कामगिरी करतो ते पाहू शकता. 


Facebook पेज इन्साईट पहा

तुमच्या Facebook पेजवरील तुमच्या जाहिरातींबद्दल इन्साईट पाहण्‍यासाठी खालील स्टेप फॉलो करा:

1
2
3
4
5
6

Instagram इन्साईट पहा

तुमच्या पेड ॲक्टिव्हिटीच्या कामगिरीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही Instagram इन्साईट वापरू शकता. तुम्ही विशिष्‍ट पोस्ट, स्टोरी, व्हिडिओ, रील आणि लाईव्ह व्हिडिओ यांच्या एंगेजमेंटवरील इन्साईटदेखील पाहू शकता. तुम्हाला ॲड इन्साईट पाहण्‍यासाठी तुमच्या मोबाईल डिव्हाईसवरील Instagram व्यवसाय किंवा निर्माता खात्यावर लॉग इन करावे लागेल.

Instagram वर तुमच्या जाहिरातींबद्दलच्या इन्साईट कशा पाहाव्या ते जाणून घेण्‍यासाठी खालील बाण वापरा.

महत्त्वाचे मुद्दे

जाहिरातींचे उद्देश आणि व्यवसाय उद्दिष्‍ट्‍यांनुसार जाहिरात व्यवस्थापकात कॅम्पेन, ॲड सेट आणि ॲड स्तरावर भिन्न मेट्रिक्स आणि परिणामांचा ट्रॅक करा.




जाहिरातीच्या उद्देशाशी सर्वाधिक समर्पक असलेले मेट्रिक्स शोधण्‍यासाठी आणि त्यांचे विश्लेषण करण्यासाठी अतिरिक्त टूल वापरा.